आज दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये होणार चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि ओमान या दोन्ही देशांचे वाणिज्य व उद्योग मंत्री यांची आज बुधवारी महत्त्वाची बैठक आयोजीत करण्यात आली आहे. याअंतर्गत दोन्ही देशातील आर्थिक संबंध आणखीन मजबूत करण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ओमानचे वाणिज्य व उद्योग आणि गुंतवणूक संवर्धन मंत्री कॅस बीन मोहम्मद अल युसेफ यांच्या उपस्थितीत एक उच्च स्तरीय प्रतिनिधी मंडळ 10 ते 14 मे पर्यंत भारत दौऱयावर येत आहे.
यामध्ये 48 सदस्यांचे एक मंडळ असून हे आरोग्य, औषध उद्योग, खाण, पर्यटन, ऊर्जा शिपेंग, दूरसंचार आणि रियल इस्टेट यासारख्या क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दोन्ही बाजूचे वरिष्ठ अधिकारी आज 11 मे रोजी बुधवारी भारत व ओमान यांच्या संयुक्त बैठक(जेसीएम)च्या 10 व्या सत्रात भाग घेणार आहेत.









