प्रतिनिधी /पणजी
संगीत क्षेत्रासाठी बहुमुल्य योगदान दिलेल्या मास्तर पुंडलिक कळंगुटकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी येथे ‘अमृत सांस्कृतिक कलाविष्कार महोत्सव 2022’ या समितीतर्फे बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीचे अध्यक्ष उद्योजक देवानंद नाईक, शंभू भाऊ बांदेकर, दामोदर केरकर, हेमंत गोलतकर, मुरारी कांदोळकर, एकनाथ गोवेकर उपस्थित राहतील. बैठकीमध्ये कार्यक्रमासंबंधी विचारविनिमय करण्यात येईल. मास्तरांचे हितचिंतक आणि मित्रमंडळींनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









