कोल्हापूर :
दहावी व बारावी परीक्षेतील गुणवत्ता वाढविणे आणि परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी कोल्हापॅर विभागीय मंडळाने तिन्ही जिल्ह्यात दोन टप्प्यात शाळाप्रमुखांची बैठक आयोजित केली आहे. कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयात मंगळवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी साताऱ्यात तर 12 डिसेंबर रोजी सांगलीत बैठक होईल. तरी सर्व प्राचार्यांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
दहावी-बारावी परीक्षा कॉपीमुक्त करून निकालातील गुणवत्ता वाढवण्यासाठी विभागीय शिक्षण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा-ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, मुख्याध्यापकांनी या बैठकीला उपस्थित राहाणे अनिवार्य आहे. मंगळवारी पहिल्या सत्रात आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, हातकणंगले व कागल या तालुक्यातील प्रतिनिधींना सभा. दुसऱ्या सत्रात करवीर, कोल्हापूर शहर, पन्हाळा, शाहूपवाडी, शिरोळ या शाळेतील प्रतिनिधींची सभा होईल. यामध्ये सीसीटीव्ही, दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती, परीक्षार्थींची संख्या, उल्लास साक्षरता सहभाग, स्कूल प्रोफाईल, परीक्षक, नियामक, पात्रता प्रमाणपत्र, प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी, खेळाडू, स्कॉऊट गाईड, एसीसींची माहिती घेतली जाणार आहे. तरी प्राचार्य, मुख्याध्यापकांनी बैठकीपुर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.








