ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शरद पवार यांच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनाम्यानंतर आज नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी मुंबई प्रदेश कार्यालयात निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला. त्यानंतर समितील सदस्यांनी ‘सिल्व्हर ओक या निवासस्थानी ‘पवारांची भेट घेत त्यांना आपला निर्णय कळवला. शरद पवार यांनी अध्यक्षपदावर कायम राहावे, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. पवारांनी निवड समितीतील सदस्यांचे म्हणने ऐकून घेतले. दरम्यान, निवड समितीने मांडलेल्या ठरावर पवार यांनी विचार करण्यास वेळ मागितला आहे. त्यामुळे आता पवार यांची भूमिका काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.








