Meeting on border issue tomorrow at Sawantwadi Gymkhana
सीमावाद हा प्रश्न गेले ५६ वर्ष सुरु आहे. बेळगाव , निपाणी , कारवारसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी मराठी भाषिक बांधव लढत आहे . कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत , सोलापूर , अक्कलकोट या भागावर हक्क सांगितलाय . कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील मराठी प्रदेशावर दावा करू लागले आहेत . मराठी भाषिकांचे सरळसरळ खच्चीकरण चालू आहे . त्यामुळे यावर विचारविनिमय करण्यासाठी सावंतवाडी जिमखाना येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे . या बैठकीला सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी , सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार तथा शिवसैनिक वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी आज केले .
सावंतवाडी / प्रतिनिधी