धारकऱ्यांना सूचना
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रोत्सवात दुर्गामाता दौडचे आयोजन करण्याबाबत रविवारी मारुती गल्ली येथील मारुती मंदिरात बैठक पार पडली. दौडमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने दौडचे नियम पाळले पाहिजेत. शिवाय नियमबाह्या घोषणा देऊ नये, दौडदरम्यान राष्ट्रभक्ती धारा या पुस्तकातील गीते व श्लोक तसेच देवीदेवतांच्या घोषणा द्याव्यात, अशा सूचना धारकऱ्यांना करण्यात आल्या. यंदा पहिल्यांदाच काही भागात नव्याने दौडला प्रारंभ होणार आहे. त्या ठिकाणी प्रचारक नेमून तेथे वक्त्यांना पाचारण करण्यात येणार आहे. याबाबत तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील मार्गदर्शन करणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना विभागवार ध्वज वाटप करण्यात आले. यावेळी प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शहर प्रमुख आनंद चौगुले, परशराम कोकितकर, पुंडलिक चव्हाण यासह धारकरी उपस्थित होते.









