प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान योगी नईम शेख यांनी मानसिक ताण तणावावर नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. तसेच जीएसटी दिन साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
असोसिएशनमधील सदस्यांच्या मुलांनी एसएसएलसी तसेच पीयूसी परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला. असोसिएशनचे सदस्य पांडुरंग वावल व श्रीधर पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.









