प्रतिनिधी/ बेळगाव
अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. शुक्रवारी सकाळी झालेल्या या बैठकीत पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग उपस्थित होते.
या बैठकीत पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच., गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम., दलित नेते मल्लेश चौगुले, सिदराई मेत्री, संतोष हलगेकर आदींसह बहुसंख्य पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
पोलीस आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्थानकात नियमितपणे बैठका होतात का, याचा आढावा घेतला. अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बीट पोलीस तुमच्या वसाहतींना नियमितपणे भेटी देऊन समस्या जाणून घेतात का? याविषयी त्यांनी माहिती घेतली. नियमितपणे बैठका घेऊन समस्या त्वरित दूर करण्याची सूचनाही त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना केली.









