दोडामार्ग – वार्ताहर
मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. त्यांनी अन्न, पाणी व वैद्यकीय सेवा यांचा सुद्धा त्याग केलेला आहे. परंतु सरकार मराठ्यांच्या प्रश्नाकडे निष्काळजी पणा दाखवत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या आंदोलनाला भरकटच चाललेले आंदोलन आहे असे संबोधतात असे जिल्ह्यातील मराठा बांधव म्हणत आहेत. यामुळे मराठा समाजाला आरक्षण या सरकारला द्यावयाचे नाही असेच दिसून येते असाही आरोप मराठा बांधवांनी केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलनाची नेमकी पुढची दिशा काय असावी ? या संदर्भामध्ये तातडीची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या मराठा नेत्यांची गुप्त बैठक सावंतवाडी येथे झाल्याचे सूत्रांकडून समजते.
Previous Articleआक्रोश पदयात्रा स्थगित! मनोज जरांगेच्या प्रकृतीच्या कारणामुऴे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय
Next Article आजचे भविष्य मंगळवार दि. 31 ऑक्टोबर 2023









