सावंतवाडी | प्रतिनिधी
मुंबई आझाद मैदान येथे सुरु असलेल्या मराठा समाज बांधवांच्या आंदोलना बाबत जिल्ह्याची भूमिका काय? याबाबत सातत्याने मराठा बांधवांकडून विचारणा होत असून उद्या दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हयाची आंदोलनाबाबत भूमिका निश्चिती करण्यासंदर्भात तातडीची मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याची सर्व मराठा बांधवांनी नोंद घ्यावी आणि या निर्णायक बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष. ॲड सुहास सावंत यांनी केले आहे.









