मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
बेळगाव : नागरिक हितरक्षण समितीच्यावतीने मंगळवार दि. 12 रोजी वक्फ बोर्ड विरोधात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता धर्मवीर संभाजी उद्यान, महाद्वार रोड येथे सभा आयोजित केली जाणार आहे. या सभेमध्ये विचार मांडण्यासाठी कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी उपस्थित राहणार आहेत. यावेळी वक्फ बोर्डमुळे बेळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत माहिती दिली जाणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.









