कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीचा निर्णय हा निर्णय टप्प्यावर पोहोचला आहे. पालकमंत्री व कोल्हापूरचे नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यानंतर हद्द वाढविरोधातील गावे पुन्हा आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.आज या गावच्या सरपंचांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या निर्णयाविरोधात निवेदन दिले आहे. या निवेदनात कोल्हापूरची हद्दवाढ आपल्या ग्रामपंचायतसाठी आणि लगतच्या गावासाठी कशी अन्यायकारक आणि त्रासदायक ठरणार आहे याचा पाढा वाचून ती तात्काळ रद्द करण्यासाठी शासनाने पावले उचलावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
एक महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या उत्तरदायित्व सभेत बोलताना कोल्हापूरची हद्दवाढ ही अनिवार्य असल्याचे सांगितले होते त्यामुळे कोल्हापूरच्या हद्दवाडीचा वाद आता वाढणार हे सगळ्यांना कळून चुकले होते. त्यानंतर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीमध्ये एक हद्दवाढी संदर्भात सूचक विधान केले. महापालिकेतील बैठकीमध्ये हसन मुश्रीफ यांनी जी गावे हद्दवाडीला सकारात्मक प्रतिसाद देतील त्यांना घेऊन हद्दवाढ केली जाईल. तसेच ज्या गावांचा विरोध असेल त्या गावांना वगळण्यात येईल. त्यामुळे ज्या गावांचा विरोध असणार आहे त्यांनी आपला वेळ वाया घालवू नये असे विधान केले होते.
पालकमंत्र्यांच्या या विधानानंतर हद्द वाढविरोधातील गाव गावे सक्रिय झाले झालेली दिसून आली या गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एक बैठक घेऊन आपल्या गावातील व्यवहार ठप्प केले. तसेच कडकडीत बंद पाळून हद्दवाढीचा निषेध केला.करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहरांमध्ये बालिंगा, पाचगाव, उचगाव शिरोली, गोकुळ शिरगाव या या गावासह एकूण १८ गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची भेट घेतली. ही हद्दवाढ आपल्या गावासाठी कशी अन्यायकारक आणि त्रासदायक आहे. याचा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासमोर ग्रामपंचायत सदस्यांनी पाढा वाचला आणि ही अन्यायकारक हदवार तात्काळ रद्द करावी यासाठी निवेदन देण्यात आले.









