वृत्तसंस्था/ लिव्हरपूल
भारतीय महिला बॉक्सर मीनाक्षी हुडाने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 48 किलो वजन गटात उपांत्य फेरी गाठत भारताचे चौथे पदक निश्चित केले.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मीनाक्षीने इंग्लंडच्या अॅलिस पम्फ्रेचा एकतर्फी पराभव केला. पम्फ्रे ही यू-19 वर्ल्ड चॅम्पियन असून तिने या लढतीत बॅकफूटवर राहून ठोसे मारत लांब हाताचा वापर करण्यावर भर दिला होता. मीनाक्षीने इच्छेप्रमाणे सरळ ठोसे लगावत पम्फ्रेलाला गुण मिळविण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ती यशस्वीही ठरली. उपांत्य फेरी गाठून तिने किमान कांस्यपदक निश्चित केले आहे. याशिवाय जस्मिन लंबोरिया (57 किलो), पूजा राणी (80 किलो) यांनीही पदक निश्चित केले आले.









