वृत्तसंस्था/ दुबई
एटीपी टूरवरील येथे झालेल्या दुबई खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. गेल्या तीन आठवड्यांच्या कालावधीत मेदव्हेदेवने एटीपी टूरवरील तीन स्पर्धा जिंकल्या आहेत.
या स्पर्धेतील शनिवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात मेदव्हेदेवने आपल्याच देशाच्या आंद्रे रुबलेवचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेत मेदव्हेदेवने उपांत्य सामन्यात सर्बियाच्या टॉप सिडेड जोकोविचला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. 2021 साली मेदव्हेदेवने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती.
आजचा सामना
मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर
ब्रेबॉर्न स्टेडियम, वेळ-सायंकाळी 7.30 वाजता









