वृत्तसंस्था/ हॅले (जर्मनी)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय खुल्या हॅले टेनिस स्पर्धेत रशियाचा डॅनिल मेदव्हेदेव आणि ग्रीकचा स्टिफॅनोस सित्सिपस यांनी एकेरीत विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.
या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात मेदव्हेदेवने मार्कोस गिरॉनचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. गेल्या आठवड्यात झालेल्या स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेत मेदव्हेदेला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. दुसऱ्या सामन्यात कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हने लॉईड हॅरीसचा 7-6(7-1), 6-4, त्याचप्रमाणे ग्रीकच्या सित्सिपसने फ्रान्सच्या बॅरेरीचा 6-7(6-8), 6-4, 7-6(7-3) असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.









