वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स (अमेरिका)
येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स बीएनपी पेरीबस पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने पहिल्यांदाच एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या या स्पर्धेत मेदव्हेदेवने पहिल्यांदाच अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. मेदव्हेदेव आणि स्पेनचा अॅलकॅरेझ यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मेदव्हेदेवने अमेरिकेच्या टिफोईचा 7-5, 7-6(7-4) असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. तर स्पेनच्या अॅलकॅरेझने यापूर्वीच एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. रशियाच्या मेदव्हेदेवने 2023 च्या टेनिस हंगामात एटीपी टूरवरील तीन स्पर्धा जिंकल्या आहेत.









