वृत्तसंस्था/ व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
एटीपी टूरवरील इरेस्टी बँक खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाचा पाचवा मानांकित डॅनिल मेदवेदेव्हने ऑस्ट्रियाच्या थिएमचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह आणि हुबर्ट हुरकेझ यांनीही प्रतिस्पर्ध्यावर विजयी नोंदवित पुढील फेरीत प्रवेश केला.
पाचव्या मानांकित मेदवेदेव्हने थिएमचा दुसऱया फेरीतील सामन्यात 6-3, 6-3 असा पराभव करत आपली वाटचाल कायम राखली आहे. या सामन्यात त्याने बेसलाईन खेळावर भर दिला होता. मेदवेदेव्हला विजयासाठी तब्बल दीड तास झगडावे लागले. दुसऱया एका सामन्यात हुबर्ट हुरकेझने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना इमिल रुसुहोरीचा 7-5, 4-6, 6-3, बल्गेरियाच्या डिमिट्रोव्हने रशियाच्या रुबलेवचा 6-3, 6-4, मार्कोस गिरॉनने कॅमेरुन नोरीचा 6-3, 6-4, यानिक सिनेरने सेरुनडोलोचा 7-5, 6-3 असा पराभव केला.









