खानापूर आरोग्य केंद्रातील स्थिती : बदलीवर गेलेल्या डॉक्टरांना पुन्हा खानापुरात रूजू करण्याची मागणी
खानापूर : येथील सरकारी दवाखान्यात पुरेशे डॉक्टर नसल्याने वैद्यकीय सेवा कोलमडली आहे. सध्या या ठिकाणी तालुका आरोग्य केंद्र असले तरी डॉक्टरांची कमतरता असल्याने उपचारांसाठी रुग्णांना बेळगावला जावे लागत आहे. त्यामुळे ऊग्णांची फरफट होत आहे. खानापूर येथील तालुका दवाखान्यातील काही डॉक्टर तात्पुरत्या बदलीच्या नावाखाली बेळगाव जिल्हा ऊग्णालयात कार्यरत आहेत. याबाबत अनेकवेळा मागणी करूनदेखील याबाबत जिल्हा वैद्याधिकाऱ्यांनी कोणताच क्रम न घेतल्याने तालुक्मयातील जनतेतून नाराजी व्यक्त होत आहेत. नूतन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून ऊग्णांच्या सेवेसाठी बदलीवर गेलेल्या डॉक्टरांना पुन्हा खानापुरात ऊजू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
खानापूर आरोग्य केंद्रात विविध रोगांवर 13 चिकित्सक डॉक्टरांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यात स्त्री रोग तज्ञ, दंत चिकित्सक, कान, नाक, घसा तज्ञ, चर्मरोग, नेत्र तज्ञ, एमडी मेडिसीन, भुलतज्ञ अशा एकूण 13 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील स्त्रीरोग तज्ञ हे या ठिकाणी कायम कार्यरत आहेत. महिलांच्या प्रसूतीसाठी तसेच विविध रोगांवर उपचारासाठी तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणात या दवाखान्यावर अवलंबून आहेत. शस्त्रक्रियेसाठी या ठिकाणी भुलतज्ञही नियुक्त केलेला आहे. मात्र अनेकवेळा भुलतज्ञ नसल्याचे कारण देत ऊग्णांना बेळगावला पाठवण्याचे प्रकार येथील दवाखान्यात घडत आहेत. स्त्री रोग तज्ञ, गरोदर महिलांना आठ-नऊ महिने तपासतात. आणि तपासणीचा अहवाल योग्य असल्याचे देतात. प्रसूतीच्यावेळी भूलतज्ञ नसल्याचे कारण देत महिलांना बेळगावला पाठवण्यात येते. याबाबत अनेकवेळा तक्रार करून देखील यात सुधारणा झालेली नाही. तसेच स्त्री रोग तज्ञ हे सध्या गेली 20 वर्षे या एकाच ठिकाणी असल्याने त्यांना संपूर्ण तालुक्मयाची नसच सापडली असल्याने ते काही ऊग्णांना जाणून-बुजून बेळगावला पाठवत असल्याची तक्रार समोर येत आहे.
काही महिन्यापूर्वी त्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली होती. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे ते प्रकरण थांबले होते. अपघातातील तसेच इतर उपचारासाठी रुग्णांना तपासणी करून बेळगावला पाठवण्यात येते. खानापुरातील तालुका रुग्णालय असूनदेखील रुग्णांची तपासणी करून उपचार केले जात नाहीत. तालुका आरोग्य केंद्रासाठी शासनाकडून कोट्यावधीचा निधी येतो. मात्र रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार करून घ्यावे लागतात. यात जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे. याबाबत नूतन आमदारांनी वैद्यकीय सेवा सुरळीत होण्यासाठी जातीने लक्ष घालून डॉक्टरांना सूचना करणे गरजेचे आहे. तसेच खानापुरात सेवेत असल्याचे दाखवून बेळगावात कार्यरत असलेल्या डॉक्टरांना तातडीने पुन्हा खानापुरात बदली करून आणणे गरजेचे आहे. तसेच येथील संपूर्ण वैद्यकीय सेवा सुरळीत होण्यासाठी आमदार हलगेकर हे काय भूमिका घेतात, याकडेही तालुक्मयाचे लक्ष लागून राहिले आहे.
100 खाटांच्या हॉस्पिटलची त्वरित गरज
खानापूर येथे नुकताच नव्या महिला व बालकांचे हॉस्पिटल बांधून तयार आहे. हा दवाखाना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने आमदारांनी तातडीने लक्ष घालून या दवाखान्याची सेवा सुरू करण्यात यावी, तसेच या ठिकाणी 100 खाटांचे हॉस्पिटलही मंजूर झाले आहे. याचा शासनदरबारी पाठपुरावा करून या नवीन दवाखान्याचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.









