शस्त्र परवाना नुतानिकरणासाठी लागणाऱ्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी 18 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले
दापोली : प्रतिनिधी
दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, वर्ग – २ डॉ. सुरेश दत्तात्रय कुराडे यांना 18 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने आज रंगेहाथ पकडले.
लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीकडून प्राप्त माहितीनुसार त्यांच्या विरोधात 29 वर्षे तरुणाने तक्रार केली होती. तक्रारदार यांचे वडिलांचा शस्त्र परवाना नुतानीकरण करावयाचा होता, यासाठी तक्रारदार यांचे वडीलांची वैद्यकीय तपासणी करुन त्या बाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते. त्या बदल्यात डॉ.कुराडे यांनी हे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी 20,000/- रु लाच रकमेची मागणी केली होती. तडजोडी अंती 18,000/- रु लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून पंचांसमक्ष स्वीकारताना आरोपी डॉ कुराडे यांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.