सांगली :
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कवलापूर (ता.मिरज) येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्याला 1 लाख 5 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत डॉ. अमोल बबनराव कोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, अमोल कोळी यांच्याशी संशा†यत केतन गणपती भोसले (रा. ए 17, सनलाईट आश्रम, नवी दिली) यांनी संपर्क केला होता.
केतनने अमोल कोळी यांना सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखविले. याकरिता एक लाख 5 हजार ऑनलाईनच्या माध्यमातून घेतले. त्यानंतर पाठपुरावा केला असता केतनने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे अमोल कोळी यांच्या लक्षात आले. हा प्रकार 26 जून 2024 ते दि. 17 जुलै 2025 या कालावधीत घडला. पोलिसांनी संशयित केतन भोसले याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.








