डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी भेटीप्रसंगी व्यक्त केले समाधान
बेळगाव : राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलला भेट दिली. तेथील उपचार पद्धती, उपकरणे आणि कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी केएलई कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, संचालक डॉ. व्ही. एस. साधुण्णावर, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. दयानंद, कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. एम. व्ही. जाली, काहेरचे कुलसचिव डॉ. एस. गणाचारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. कोरे यांनी सरकारने आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, फुफ्फुस प्रत्यारोपण या योजनेत समाविष्ट नाही. याची नोंद घेऊन योजनेत फुफ्फुस प्रत्यारोपणालाही समाविष्ट करावे. तसेच या योजनेंतर्गत येणाऱ्या रुग्णांना सरकारी हॉस्पिटलमधून सूचनापत्र घेऊन येण्याची सक्ती केली जाते. ती रद्द करावी, अशी मागणी केली. याबाबत आपण लक्ष घालू, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली.









