Kolhapur : अंबाबाई मंदिरात माध्यमांच्या कॅमेऱ्यांना अटकाव करणारा अजब फतवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे. अंबाबाई मूर्ती संदर्भात वास्तव समोर आल्यानंतर जिल्हाधिकऱ्यांनी फर्माण काढले. माध्यमांच्या कॅमेऱ्यांसह प्रतिनिधींना मंदिरात जाण्यास रोखले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तोंडी आदेश दिल्याची देवस्थान समितीची माहिती आहे. माध्यम टीआरपी साठी भांडवल करत असल्याचा आरोप मंदिर प्रशासक करत आहे. वस्तुस्थिती दर्शक बातम्या येत असल्याने जिल्हाधिकारी बिथरले का? असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी केला आहे.
Previous Articleराज्यात बेळगाव सर्वात प्रदूषित शहर
Next Article कुंडई येथे अनुवादित संपूर्ण रामायणाचे विमोचन









