बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि वरुण धवनचा आगामी चित्रपट ‘बॉर्डर 2’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याचदरम्यान निर्मात्यांनी चित्रपटातील आणखी एका नायिकेचे नाव जाहीर केले आहे. ‘बॉर्डर 2’ या चित्रपटात मेधा राणा ही अभिनेत्री दिसून येणार आहे. वरुण धवनची नायिका म्हणून ती झळकणार आहे. ‘बॉर्डर 2’ चित्रपटासाठीची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाशी संबंधित छायाचित्रे आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निर्मात्यांनी आता मेधा राणा या चित्रपटात नायिका म्हणून झळकणार असल्याचे सांगितले आहे.
‘बॉर्डर 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंह करत आहेत. या चित्रपटात सनी देओल, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी आणि वरुण धवन हे कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात वरुण धवन हा परमवीर चक्र विजेते मेजर होशियार सिंह दहिया यांची भूमिका साकारणार आहे.









