वृत्तसंस्था/ माँटमेलो, स्पेन
येथे झालेल्या स्पॅनिश ग्रां प्रि फॉर्मुला वन शर्यतीत मॅक्लारेनच्या ऑस्कर पियास्ट्रीने जेतेपद पटकावले. थ्याचाच सहकारी लँडो नोरिसने दुसरे स्थान मिळविले. फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने तिसरे स्थान मिळविले.
व्sड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनला पाचवे स्थान मिळाले होते. पण चौथ्या स्थानावरील जॉर्ज रसेलच्या गाडीला टक्कर मारल्याने त्याला दहा सेकंदाची पेनल्टी देण्यात आली. थ्यामुळे त्याला दहावे स्थान मिळाले. मॅक्लारेनला वन-टू फिनिश मिळण्याची ही या मोसमातील तिसरी वेळ आहे. आतापर्यंतच्या 9 शर्यतीतील मॅक्लारेनचे हे सातवे जेतेपद आहे. थ्यापैकी एकट्या पियास्ट्रीने पाच शर्यती जिंकल्या आहेत. ड्रायव्हर्स रेसिंगमध्ये पियास्ट्रीचे 186 गुण झाले असून नोरिसचे 196 गुण झाले आहेत. व्हर्स्टापेने नोरिसपेक्षा 49 गुणांनी मागे आहे.









