वृत्तसंस्था/ शांघाय
मॅक्लारेनचा ड्रायव्हर ऑस्कर पियास्ट्रीने पहिले चायनीज ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावले. त्याचाच संघसहकारी लँडो नॉरिसने दुसरे स्थान मिळविले. फॉर्मुला वन शर्यतीत पहिली दोन स्थाने पटकावण्याची मॅक्लारेनची ही 50 वी वेळ आहे.
शनिवारी पियास्ट्रीने पहिल्यांदाच पोल पोझिशन मिळविले होते. रविवारी त्याने शानदार सुरुवात करीत पहिल्या कॉर्नरवर आघाडी घेतली तर त्याचा सहकारी नॉरिसने रसेलला मागे टाकत दुसरे स्थान मिळविले. पियास्ट्रीने आघाडी कायम अखेरपर्यंत कायम राखत कारकिर्दीतील तिसरे जेतेपद पटकावले. मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने तिसरे स्थान घेत या मोसमातील सलग दुसऱ्या शर्यतीत पोडियम फिनिश मिळविले. मागील वर्षी ही शर्यत जिंकलेल्या रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने चौथे, फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने पाचवे स्थान मिळविले तर शनिवारी फेरारीसाठी पहिली स्प्रिंट रेस जिंकणाऱ्या लेविस हॅमिल्टनने सहावे स्थान मिळविले.









