वृत्तसंस्था /लंडन
कॅनडाची डॅनियली मॅकगेहे ही बांगलादेशमध्ये होणार असलेल्या 2024 च्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीदरम्यान तिच्या दत्तक देशाचे प्रतिनिधीत्व करून आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणारी पहिली तृतीयपंथी क्रिकेटपटू बनेल. 29 वर्षीय मॅकमगेहे ही एक सलामीवीर फलंदाज आहे. तिने ‘पुऊष ते महिला’ असे स्थित्यंतर केलेल्या तृतीयपंथी खेळाडूंसाठीच्या ‘आयसीसी’च्या पात्रता निकषांची पूर्तता केल्यानंतर पुढील महिन्यात होणार असलेल्या पात्रता स्पर्धेसाठीच्या कॅनडाच्या महिला संघात तिची निवड झाली आहे. पात्रता स्पर्धा 4 ते 11 सप्टेंबरदरम्यान लॉस एंजेलिस येथे खेळवली जाईल. जागतिक स्तरावरील पात्रता फेरीत स्थान मिळवण्यासाठीच्या ‘आयसीसी अमेरिका क्वालिफायर’मध्ये कॅनडाचा अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिका यांच्याशी सामना होईल. ‘हा माझा सन्मान आहे. माझ्या समुदायाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणे ही अशी गोष्ट आहे जी मी करू शकेन, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते’, असे मॅकगेहेने सांगितले.
मॅकगेहेने फेब्रुवारी, 2020 मध्ये ऑस्ट्रेलियातून कॅनडा गाठल्यानंतर नोव्हेंबर, 2020 मध्ये पुऊषाकडून स्त्राr बनण्याचे सामाजिक संक्रमण सुरू झाले, तर मे, 2021 मध्ये वैद्यकीय संक्रमणास सुऊवात झाली. मॅकगेहेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सहभाग हे ‘आयसीसी’ने त्यांच्या समान हक्क धोरणाच्या अनुषंगाने टाकलेले एक मोठे पुढचे पाऊल आहे. ‘दर महिन्याला रक्ततपासणी करणे हे कदाचित सर्वांत मोठे आव्हान आहे. कारण जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असता तेव्हा तुम्ही खूप प्रवास करत असता’, असे मॅकगेहेने म्हटले आहे. मॅकमगेहेने देशातील महिलांच्या आंतरप्रांतीय स्पर्धेदरम्यान क्रिकेट कॅनडाच्या निवड समितीचे लक्ष तिच्या फलंदाजीद्वारे सर्वप्रथम वेधले. त्यानंतर ऑक्टोबर, 2022 मध्ये दक्षिण अमेरिकी स्पर्धेत तिने चार ‘टी-20’ सामन्यांमध्ये कॅनडाचे प्रतिनिधीत्व केले. परंतु त्या सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आलेला नव्हता.









