मुंबई :
माझगाव डॉक शिपबिल्डर्सचा समभाग शेअर बाजारात मंगळवारच्या सत्रात वधारताना दिसला आहे. युरोपमध्ये कंपनीला कामाचे कंत्राट मिळाल्याच्या बातमीने कंपनीचा समभाग मंगळवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 7 टक्के वाढलेला दिसला आहे. समभाग अशा रितीने 2219 रुपयांवर पोहचला आहे. सहा फर्मचे बांधकामाचे कंत्राट कंपनीला प्राप्त झाले आहे. 8 सप्टेंबरला समभागाचा भाव 2483 रुपयांवर विक्रमी स्तरावर पोहचला होता.









