खो-खो, कबड्डी व फुटबॉल खेळांचा समावेश
बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयोजित महापौर चषक आंतरशालेय 17 वर्षांखालील व आंतरकॉलेज, पदवीधर यांच्यासाठी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन शुक्रवारपासून सुभाषचंद्र बोस (लेले) मैदानावर तर खो-खो व कबड्डी स्पर्धा धर्मवीर संभाजी उद्यान येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा विनामूल्य आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाणसह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9 वाजता फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन होणार असून दुपारी ध. संभाजी उद्यान येथे मुलांच्या खो खो व कबड्डी स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. फुटबॉल स्पर्धेत कॉलेज गटात केएलई इंजिनियरींग, मराठा मंडळ पॉलिटेकनिक, अंगडी, जैन इंजिनियरींग, व्हीपीपी, जीआयटी, गोगटे, जैन, जीएसएस, लिंगराज, भतेश पॉलिटेक्निक, एसजीबीआयटी, केआयपीटी या संघानी भाग घेतला आहे.
शालेय स्पर्धेत मुलांच्या गटात ज्योती सेंट्रल, एमव्हीएम, जी.जी. चिटणीस, हेरवाडकर, प्लेजेंन्ट कॉन्व्हेंट, मुक्तांगण, केएलएस आदी संघानी तर मुलींच्या गटात सेंट झेव्हियर्स, केपीएस, सेंट जोसेफ, सेंट जोसेफ 2 संघानी भाग घेतला आहे. यापूर्वी खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात महालक्ष्मी स्पोर्ट्स-यडोगा, छत्रपती शिवाजी हायस्कूल कडोली, चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर, एमव्ही बेळगाव, अलतगा स्पोर्ट्स अलतगा, बालिका आदर्श, रामलिंग हायस्कूल-तुरमुरी, महाराष्ट्र हायस्कूल-येळ्ळूर या संघानी तर मुलांच्या गटात महालक्ष्मी स्पोर्ट्स-यडोगा, छत्रपती शिवाजी हायस्कूल-कडोली, चांगळेश्वरी हायस्कूल-येळ्ळूर, एमव्ही बेळगाव, रामलिंग हायस्कूल-तुरमुरी, महाराष्ट्र हायस्कूल-येळ्ळूर, भगतसिंग स्पोर्ट्स-आंबेवाडी, मंडोळी हायस्कूल आदी संघाचा समावेश आहे. महानगरपालिकेतर्फे प्रतिवर्षी या स्पर्धा भरविण्यात येत होत्या. मात्र कोरोनाच्या महाभयंकर आजारामुळे ही खंडीत पडली. पुन्हा या स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. या फुटबॉल, खो-खो व कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. कबड्डी, खो खो, फुटबॉल स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून सर्व संघांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन उपमहापौर आनंद चव्हाण यांनी केले.









