आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी देवविली सर्वांना शपथ
प्रतिनिधी/ बेळगाव
आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी स्वत:सह महापालिकेतील कर्मचारी आणि महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांनी शपथ घेतली. सदर शपथ आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सर्वांना दिली.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व सरकारी कार्यालयांमध्ये ही शपथ घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण त्या आदेशाचे पालन करायचे असून सर्वांनी शपथ घ्यायची असल्याचे त्यांनी सांगितले. आपण ज्या ठिकाणी काम करतो, ज्या देशात राहतो त्या देशाचे धन्यवाद मानने आपले कर्तव्य आहे. सर्व काम प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठपणे करण्याबाबत तसेच देशाच्या अखंडतेबाबत शपथ देण्यात आली.
यावेळी महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, आरोग्य निरीक्षक डॉ. संजीव डुमगोळ, मनपा उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









