सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या बी. ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात कोकणचे सुपुत्र आणि प्रसिद्ध लेखक डॉ. महेश केळुस्कर यांच्या दशावतार पुस्तकातील मयासुरवध या संहितेचा समावेश करण्यात आला आहे. पंचम खेमराज महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठ संचालित स्वायत्त महाविद्यालय असून त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाने दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता दिली आहे. नुकतीच महाविद्यालयात मराठी अभ्यासमंडळाची सभा सभा झाली. या सभेत बी. ए. द्वितीय वर्ष सत्र ४ साठी मराठीच्या अभ्यासक्रमात दशावतार पुस्तकातील संहिता मयासुरवध या घटकाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. दशावतार ही कोकणची पारंपरिक लोककला असून अनेक कलाकारांनी ही कला आजही टिकवून ठेवली आहे. या कलेचा प्रसार व्हावा आणि नव्या पिढीला माहिती व्हावी यादृष्टीने हा धडा महत्वपूर्ण ठरणार आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









