वृत्तसंस्था/ बेंगळूर
अनुभवी सलामीवीर मयांक अगरवालची येत्या रणजी मोसमात होणाऱ्या पहिल्या दोन सामन्यासाठी कर्नाटक संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे तर युवा फलंदाज निकिन जोस याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संघात बेळगावच्या सुजय सातेरीलाही स्थान मिळाले आहे.
या सामन्यासाठी कर्नाटकने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली असून त्यात केएल राहुलचा समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय संघाचे मायदेशात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अफगाण (टी-20), इंग्लंड (5 कसोटी) या संघांविरुद्ध सामने होणार असल्याने राहुलला कर्नाटक संघात स्थान देण्यात आलेले नाही. 2022-23 या मोसमात अगरवालने शानदार प्रदर्शन करीत 9 सामन्यांत सर्वाधिक 990 धावा जमविल्या होत्या. त्यात तीन शतके व सहा अर्धशतकांचा समावेश होता. या मोसमात कर्नाटकची सलामीची रणजी लढत पंजाबविरुद्ध हुबळी येथे 5-8 जानेवारी या कालावधीत होणार आहे. दुसऱ्या सामन्यात त्यांची लढत गुजरातविरुद्ध अहमदाबाद येथे 12 ते 15 जानेवारी या अवधीत होईल. माज्aााr फलंदाज पीव्ही शशिकांत यांना या संघाच्या प्रशिक्षकपदी या मोसमातही कायम ठेवण्यात आले आहे.









