वृत्तसंस्था/ पुणे
येथे झालेल्या गद्रे मारिनी आयटीएफ कनिष्ठांच्या (18 वर्षाखालील वयोगट) टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत माया राजेश्वरन रेवतीने मुलींच्या गटातील तर वाईल्ड कार्डधारक अर्णव पापरकरने मुलांच्या गटातील उपविजेतेपद मिळविले.
माया रेवतीने 2023 च्या टेनिस हंगामातील हे पाचवे विजेतेपद मिळविले आहे. या स्पर्धेत कोईमत्तूरच्या 15 वर्षीय माया रेवतीने अंतिम सामन्यात हैद्राबादच्या लक्ष्मीश्री दंडूचा 6-4, 2-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना जवळपास 3 तास चालला होता. 18 वर्षाखालील मुलांच्या विभागात फ्रान्सच्या मॉइसी कौमेने अजिंक्यपद मिळविताना भारताच्या पापरकरचा 6-3, 6-3 असा फडशा पाडला.









