वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे झालेल्या आयटीएफ 300 दर्जाच्या मुले आणि मुलींच्या टेनिस स्पर्धेत भारताच्या माया राजेश्वरन रेवतीने मुलींच्या एकेरीतील अजिंक्यपद पटकाविताना इकटेरिना सुपिसेनाचा पराभव केला. या स्पर्धेत मुलांच्या एकेरीतील जेतेपद हेवाँगने पटकाविले.
मुलींच्या एकेरीतील अंतिम सामन्यात 15 वर्षीय मायाने सुपिसेनाचा 3-6, 7-5, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. मायाने गेल्या वर्षी पुण्यामध्ये झालेली आयटीएफ स्पर्धा जिंकली होती. मुलांच्या एकेरीतील अंतिम सामन्यात हेवाँगने भारताच्या रोषन संतोषचा 6-1, 6-1 असा पराभव केला.








