जय गणेश स्कुलचा उपक्रम
मालवण / प्रतिनिधी
भाकरीची गोष्ट हा धडा मुलांनी पाठ्यपुस्तकात शिकला परंतु शेतकरी धान्य उगवण्यासाठी जे कष्ट करतो ते आज प्रत्यक्ष अनुभवले . जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यर्ध्यानी शेतीच्या बांधावर उतरत शेतीचा अनुभव घेतला . इयत्ता सातवी व आठवीच्या विध्यार्थानी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.तरवा काढणे व लावणे याचे मार्गदर्शन तेथे उपस्थित ग्रामस्थांनी केले.यासाठी श्री.गुरुप्रसाद पुरुषोत्तम चव्हाण ( बबलू चव्हाण) व कुटुंबीय यांनी त्यांच्या शेतात शाळेचा उपक्रम राबवण्यास सहकार्य केले. सर्व मुलांच्या बसण्याची तसेच भोजनाची व्यवस्था त्यांनी उत्तमरित्या केली. रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी असलेल्या या मस्तीच्या शाळेत उपस्थित श्री.पराडकर सर, श्री.राणे सर,श्रीम.चौकेकर, श्रीम.सावंत, श्रीम. घाटवळ श्रीम.करमळकर श्रीम.ठाकूर मॅडम आदी सर्व शिक्षक उपास्थित होते.









