प्रतिनिधी/ बेळगाव
सरते वर्ष कोरोनाला घेऊन जावो आणि नववर्ष आरोग्यमय राहो, अशी भावना बाळगून कपिलेश्वर रोड रामामेस्त्री अ•ा येथील युवकांनी 31 डिसेंबरच्या रात्री कोरोनाच्या प्रतिकृतीचे दहन केले. एका अर्थाने समस्त जनतेच्या मनातील भावनाच त्यांनी कोरोना प्रतिकृतीच्या दहनाद्वारे व्यक्त केली.
पुन्हा कोरोना हळुहळु डोकेवर काढत आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनाने जगभरात हैदोस घातला. लॉकडाऊन, कर्फ्यू यांना सामोरे जावे लागले. परिणामी अर्थचक्र कोलमडले. आता कुठे हळुहळु अर्थचक्र रूळावर येत आहे. त्यामुळे परत कोरोनाचे सावटसुद्धा नको, अशी मानसिकता समाजाची आहे. या सगळ्या वास्तवाची जाणीव करून देत या युवकांनी कोरोनाची प्रतिकृती करून तिचे दहन केले. आणि आगीच्या झळांमध्ये कोरोना खरोखरच नष्ट होवो, अशी भावना व्यक्त केली.









