वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन संघातील अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल वाहन दुर्घटनेत जखमी झाल्याने त्याला इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेला मुकावे लागणार आहे. शनिवारी मेलबोर्नमध्ये एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला मोटारीतून जात असताना हा अपघात घडला. या अपघातात त्याच्या पायाचे हाड मोडले असून त्याला काही दिवस क्रिकेटपासून अलिप्त राहावे लागेल.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका चालू आठवडय़ात सुरू होत आहे. येत्या डिसेंबर महिन्यात शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत तो खेळू शकणार नाही. तसेच ऑस्ट्रेलिया अ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱया सामन्यातही तो उपलब्ध होऊ शकणार नाही. या दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी त्याला काही कालावधी लागणार आहे.









