मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन
बेळगाव : मॅक्सिकॅब वाहनांना परमीट देताना अनेक बंधने लादण्यात आली आहेत. 2021 पूर्वी परमीटची प्रक्रिया सुरळीत होती. परंतु, त्यानंतर मात्र अनेक नियम लादल्याने ही प्रक्रिया किचकट होत असल्याने वाहनचालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे येत्या अधिवेशनात आंदोलन करून परिवहनमंत्री रामलिंगा रे•ाr यांना निवेदन देणार असल्याचे उत्तर कर्नाटक मॅक्सिकॅब असोसिएशनच्या बैठकीत अध्यक्ष सी. एस. राचण्णावर यांनी सांगितले. वाहनांच्या परमीटसाठी 2100 रुपये शुल्क असताना 8 ते 9 हजार रुपये उकळले जात आहेत. अनेकवेळा तक्रारी करून देखील हे प्रकार बंद झालेले नाहीत. त्यामुळे परमीट व पासिंगसंदर्भात वाहनचालकांना येणाऱ्या सर्व समस्या परिवहन मंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. फेब्रुवारी 2023 पासून वाहनांचे पासिंग बंद केल्याने अनेक वाहनचालक अडचणीत आले असल्याने यावर तोडगा काढण्याची मागणी बैठकीत केली. मागण्या मान्य न झाल्यास यापुढील काळात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. यावेळी उत्तर कर्नाटक मॅक्सिकॅब असोसिएशनचे अध्यक्ष सी. एस. राचण्णावर, कार्याध्यक्ष एच. एन. तोपिनकट्टी, रियाज हिरेकुडी, उपाध्यक्ष प्रवीण फडके, शशिकांत दिंडे, मोहसीन लिंबूवाले यांच्यासह खानापूर, कित्तूर येथील सदस्य उपस्थित होते.









