वृत्तसंस्था/ सुझुका
रविवारी येथे झालेल्या जपान ग्रा प्रि एफ 1 मोटर रेसिंग शर्यतीमध्ये रेडबुल चालक मॅक्स व्हर्स्टेपनने विजेतेपद पटकावत सलग तिसऱ्यांदा त्याने एफ 1 ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपच्या दिशेने वाटचाल केली आहे. 2023 च्या एफ 1 रेसिंग हंगामातील रेडबुल चालक व्हर्स्टेपनचे हे 13 वे विजेतेपद आहे. जपान ग्रा प्रि शर्यतीमध्ये मॅक्लेरेन चालक लेंडोनोरीसने दुसरे स्थान तर ऑस्ट्रेलियाच्या ऑस्कर पिसेट्रीने तिसरे स्थान पटकावले.









