वृत्तसंस्था / किगेली
आंतरराष्ट्रीय मोटार रेसिंग एफ-1 क्षेत्रातील रेडबुल चालक मॅक्स व्हर्स्टेपनने सलग चौथ्या वर्षी सर्वंकश जेतेपद मिळविले आहे. रेवांडाचे अध्यक्ष पॉल कागेमी यांच्या हस्ते मॅक्स व्हर्स्टेपनला सर्वंकश जेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला.
एफ-1 मोटार रेसिंग क्षेत्रात वर्ष अखेरीच्या रेसिंग हंगामातील सर्वंकश जेतेपद बक्षीस वितरण समारंभ पहिल्यांदाज आफ्रिकामध्ये भरविला आला होता. आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल फेडरेशनचे अध्यक्ष मोहम्मद बेन सुलेयाम तसेच रेवांडाचे अध्यक्ष कागेमी यांच्या हस्ते व्हर्स्टेपनने हा चषक स्वीकारला. 1950 साली एफ-1 मोटार सायकल रेसिंगला प्रारंभ झाला. दरम्यान 4 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा सर्वंकश जेतेपद मिळविणारा व्हर्स्टेपन हा सहावा चालक आहे. मॅक्लेरेनने पहिल्यांदा हा बहुमान मिळविला होता. मॅक्लेरेनच्या नोरीसने व्हर्स्टेपनचे या प्रसंगी खास अभिनंदन केले आहे. व्हर्स्टेपन हा मेक्सीकोचा नागरिक असून रेडबुल संघामध्ये मेक्सीकोच्या पेरेझचा सहभाग आहे.









