बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित चंदन कुंदरनाड पुरस्कृत विश्रुत चिट्स लिटिल मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात मॅक्स आनंद अकॅडमी व साईराज वॉरिअर्स पालेकर अकादमी हे विजयी झाले. पहिल्या सामन्यात मॅक्स आनंद अकादमी संघाने शार्प एंटरप्राइजेस संघाचा 31 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मॅक्स आनंद अकादमीने 25 षटकात 6 बाद 143 धावा केल्या. यश ठाकूर 7 चौकारांसह 39, अद्वेत चव्हाण 37, आरुष देसुरकर 34 धावा केल्या. शार्प इंटरप्राईजेसतर्फे कनिष्क वेर्णेकर व विश्रुत कुंदरनाड यांनी प्रत्येकी दोन तर श्रेयांशने एक गडी बाद केला. उत्तरा दाखल शार्प इंटरप्रायजेस संघाचा डाव 22.5 षटकात 112 धावात आटोपला. अक्षय बालीगारने एकाकी झुंज देताना दहा चौकारांसह 59, दक्ष शेरीगार 21 धावा केल्या. मॅक्स आनंद अकादमीतर्फे शिवम काटवे, अद्वेत चव्हाण, ऋषभ आर्यन व सिद्धांत एन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. सामनावीर अद्वैत चव्हाण सामन्यातील इम्पॅक्ट खेळाडू अक्षय बालीगार यांना प्रमुख पाहुणे राजू केलगिरी प्रदीप शेरीगार व अॅड. सिद्धू मालाडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्स पालेकर अकादमी संघाने के. आर. शेट्टी किंग्स संघाचा 16 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना साईराज वॉरियर्सने 25 षटकात 7 बाद 125 धावा केल्या. अद्वैत भटने सर्वाधिक 39, शाहरुख धारवाडकरने 19, श्लोक चडीचालने 16 धावा केल्या. के. आर. शेट्टी किंग्सतर्फे ब्रश रायकर, यश चौगुले यांनी प्रत्येकी दोन तर खोत व वरदराज पाटीलने प्रत्येकी एक गडी बाद केला. उत्तरादाखल के. आर. किंग्जने 24.1 षटकात 109 धावात गारद झाला. खोत सर्वाधिक 29, दृश रायकरने 15, जैविक मूकबस्तने 13 धावा केल्या. साईराजतर्फे मंदार के., रितेश धामणेकर यांनी प्रत्येकी दोन तर शाहरुख धारवाडकर, नीरज एम., श्लोक चडिचाल, अद्वैत भट यांनी प्रत्येकी एक गडी बात केले. सामनावीर अद्वेत भट इम्पॅक्ट खेळाडू रितेश धामणेकर यांना प्रमुख पाहुणे सोमशेखर कुंदरनाड, अभिषेक कोळेकर, होळीपा पुजारी, विशाल चडीचाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.









