ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाविकास आघाडीला लोकसभेच्या 38 तर विधानसभेच्या 180 जागा मिळतील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
धुळे येथे आज मतदारांचा मेळावा पार पडला. त्यानंतर ते मीडियाशी बोलत होते. ते म्हणाले, 2024 निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजुटीने काम केलं तर लोकसभेला 38 आणि विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा मिळतील.
ईव्हीएम मशीनवर माझा विश्वास असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होतं, याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, जेव्हा निवडणुकीचा निकाल समोर येतो तेव्हा ईव्हीएम मशीनबाबत संशय निर्माण होतो. त्यामुळे कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं
राज्यात अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडं पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून ते अयोध्या दौरा करत आहेत. वादळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांची पीकं मातीमोल झाली आहेत. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे, मात्र, त्याकडे सरकारचे लक्ष्य नाही, असेही थोरात म्हणाले.








