सध्या कोणतीच बंधने नसल्याने हिंदू समाजात जी बेशिस्त दिसून येते तिला मौजीबंधनाने आळा बसेल. कुंडई येथील तपोभूमीत पीठाधीश पूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या मार्गशर्दनाखाली हे कार्य चालू आहे. ते योग्य परिवर्तन घडविणारे असून अभिनंदनीय आहे. ही व्यवस्था आमच्या सर्व धर्मगुरुंनी अंगिकारावी व समाजामध्ये कालानुरुप बदल घडवून आणावा.
हजारो वर्षांचा इतिहास आणि परंपरा असलेल्या हिंदू धर्माला जगात जो मान आहे तो त्याच्यातील महान आणि मानवतावादी तत्वज्ञानामुळे. आपण चराचरात देवाला पाहतो. वनस्पती, प्राणी यामध्ये तर तो आहेच पण दगडांमध्येही आपणाला तो दिसतो. झाडांची आणि प्राण्यांची देखील पूजा करणारा आपला धर्म निसर्गाशी एकऊप झालेला किंबहुना निसर्गातूनच जन्माला आलेला हिंदू धर्म. हिंदू धर्म सर्व समाजामध्ये आनंद व सुख समाधान पसरवतो. आपल्याला मिळणाऱ्या आनंदावर समाधान मानण्यापुरते आपले हिंदू धर्म तत्वज्ञान संकुचित नसून ‘ॐ सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया:। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिदु:खभाग्यवेत। असा सर्व मानवजातीच्या कल्याणाचा उदात्त विचार त्यामध्ये आहे. हिंदूंनाच सुख शान्ति मिळो अथवा हिंदू धर्मात आलात तरच आपल्याला सुख मिळेल, हिंदू झालात तरच आपल्याला मोक्ष मिळेल असे आपले तत्वज्ञान सांगत नाही. धर्मांतराचा आग्रहही धरीत नाही. अनेक धर्मांचे प्रचारक आपलेच तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे असे सांगून तो धर्म आमिषे दाखवून, फसवणूक कऊन तर कधी बळजबरी कऊन इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात. अशा पार्श्वभूमीवर कुणावरही बळजबरी न करणारा आणि विविधतेत एकता पाहणारा दुसरा धर्म नसेल.
भारतीय सर्वोच्च तत्वज्ञानाच्याच आधारे भारताचे माननीय पंतप्रधान जेव्हा जगाला ‘दहा ाartप्, दहा aिस्ग्त्ब्, दहा ल्tिल्rा’ हा संदेश देतात तेव्हा जगातले मोठमोठाले तत्ववेत्ते, विचारवंत आणि सत्ताधीश भारावून जातात.
हिंदू समाज कालांतराने जातीपाती व आणि उच्चनीचतेच्या कल्पनांनी कसा विभागला गेला हे समजणे जरी शक्य नसले तरी आताप्रमाणेच ‘अन्ग्dा aह् Rल्त’ या राजसूत्रांचा वापर करून आपल्या स्वार्थासाठी धर्मसत्तेने अथवा राजसत्तेने हे भेदाभेद जन्माला घातले असावे असे मानण्यास वाव आहे. राजकारणी लोक या भेदाभेदांचा वापर आपल्या फायद्यासाठी कसा करतात हे आपण पाहतोच आहोत.
हिंदू धर्मातील लोक जातीपातीत विभागले गेल्यामुळे आणि त्यांच्यात एकी राहिली नसल्याने हिंदूस्थान आक्रमणांना बळी पडला आणि शेकडो वर्षे परकीय सत्तेखाली भरडला गेला. छ. शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतरच त्या विध्वंसाला आळा बसला. युगपुरूष शिवाजी महाराज झाले नसते तर या देशाचे काय झाले असते त्याची कल्पनाच करवत नाही. शिवाजी महाराजांच्या कालखंडात व नंतरही अनेक साधूसंत व समाजसुधारकांनी हिंदूंमध्ये जागृती करण्याचे व जातीभेद नष्ट करण्याकरता प्रयत्न केले. आजही अनेक संतमहंत व विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, हिंदू जागरण समिती या सारख्या इतरही अनेक संस्था हिंदूंना एकत्र आणण्यासाठी कार्य करीत आहेत. आमचे पीठाधीश या दृष्टीकोनातून काही कार्य करीत असल्याचे दिसत नाही.
आद्य शंकराचार्यांनी भारताच्या चारही दिशांना चार धर्मपीठे स्थापन केली होती. परंतु आज ही पीठे व त्यांची उपपीठे फारशी कार्यरत असल्याचे दिसत नाही. वास्तविक हिंदू धर्मरक्षणाचे व धर्मप्रसाराचे कार्य त्यांच्यामार्फत व्हावयास हवे होते. सर्वांना धर्मशिक्षण मिळावे याकरता त्यांनीच व्यवस्था करावयास हवी होती. आज जी व्यवस्था आहे ती, ब्राह्मणांपुरती मर्यादित आहे व तीही मुख्यत्त्वे पौरोहित्य सांभाळण्यापुरती. आज गरज आहे ती सर्व हिंदूंना एकत्र आणण्याची व त्यांना धार्मिक शिक्षण देण्याची. त्यासाठी सर्व हिंदूंसाठी एकच समान अभ्यासक्रम तयार करण्याची व त्याची अंमलबजावणी करण्याची. आज असे शिक्षण मिळवण्यास हिंदू उत्सुक आहेत. यासाठी अभ्यासक्रम तयार करणे व तो पीठे, उपपीठे यामार्फत अंमलात आणणे ही जबाबदारीही आमच्या मुख्य धर्मपीठांची आहे आणि नम्रतापूर्वक म्हणावेसे वाटते की त्यांनी ती स्वीकारावयास हवी. इतर धर्मांचे कार्य पाहता धर्मशिक्षण, धर्मरक्षण व धर्मप्रसार याबाबतीत आपले धर्मगुरू कमी पडतात असे वाटते.
धर्मशिक्षणाची सुरवात व्रतबंध संस्कारांनी म्हणजेच मौजीबंधनाने झाली पाहिजे. आठ वर्षे वय झाल्यानंतर प्रत्येक मुलाचे व मुलीचे मौजीबंधन झाले पाहिजे व त्यांना कमीत कमी एक वर्ष धार्मिक शिक्षण दिले गेले पाहिजे. यामुळे आपल्या धार्मिक मुलतत्वांचा त्यांना परिचय होईल व आपला धर्म व संस्कृती श्रेष्ठ आहे, हे समजून आल्यानंतर त्यांच्यात सार्थ अभिमान निर्माण होईल. धार्मिक दृष्ट्या सर्वांना एकाच पातळीवर आणल्याने भेदाभेद नष्ट होण्यास मदत होईल. मौजीबंधन हा हिंदू धर्माची दीक्षा देणारा कार्यक्रम व्हावा व दीक्षा सर्वांना मिळावी. आपल्यापैकी काही लोकांना विशेषत: रुढीग्रस्त लोकांना वरील विचार अप्रस्तुत वाटण्याचा संभव आहे. परंतु या विचारात नवीन काहीच नाही. ज्या गोष्टी आपण विसरलो आहोत. त्याची फक्त ही आठवण आहे. पूर्वी सर्वांच्या मुंजी बांधल्या जात आणि त्यानंतर ते ऋषी मुनींकडे शिक्षणासाठी जात. सुरुवातीस जीवनावश्यक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या ज्ञानशाखेकडे अथवा व्यावसायिक शिक्षणाकडे वळत असे. काहीजण शास्त्रांचे शिक्षण घेत तर काही शस्त्रांचे. काही जण शेतीचे तर काहीजण इतर व्यवसायांचे. कुणालाच कमी मानत नसत. माझ्या दृष्टीने शुद्र ही जात नव्हती. कारण जन्मात जायते शूद्र:। संस्कारात द्विज उच्चते। असे शास्त्रवचन आहे. याचा अर्थ जन्माला येणारा प्रत्येक माणूस शूद्र म्हणजे संस्कारहीन असतो. संस्कार झाल्यानंतर तो विद्वान, तज्ञ होता. तेव्हा शूद्र ही जात नसून माणसाची जन्मानंतरची अवस्था आहे. मला वाटते वयाचे आठ ते दहा वर्षे या कालावधीत प्रत्येक मुलाचे व मुलीचे मौजीबंधन व त्यानंतरचे धार्मिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. त्या शिक्षणाद्वारे हिंदूंचे जीवन शिस्तीचे व अर्थपूर्ण होईल व त्यांच्यात एकतेची भावना वाढीस लागेल. सध्या कोणतीच बंधने नसल्याने हिंदू समाजात जी बेशिस्त दिसून येते. तिला आळा बसेल. खूप आनंद वाटतो की असे कार्य गेली कित्येक वर्षे गोव्यात कुंडई येथील तपोभूमीत पीठाधीश पूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या मार्गशर्दनाखाली चालू आहे. हे त्यांचे कार्य योग्य परिवर्तन घडविणारे व म्हणूनच अभिनंदनीय आहे. ही व्यवस्था आमच्या सर्व धर्मगुरुंनी अंगिकारावी व समाजामध्ये कालानुरुप बदल घडवून आणावा, अशी नम्र सूचना आहे. मनुस्मृती हा आपला धर्मग्रंथ चांगला असून त्यातील अनेक विचार चांगले आहेत.
गो. रा. ढवळीकर








