पुराच्या पाण्यात अडकलेल्या युवकाला काढले सुखरूप बाहेर
मातोंड- होडावडा पुलानजीकच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या तुळस येथील तरुणाला मातोंड येथील होमगार्ड समादेशक अधिकारी संतोष विष्णू मातोंडकर, ग्रामस्थ ज्ञानेश्वर मोहिते, कृष्णकांत घोगळे, विशाल घोगळे, अनिकेत जोशी, राहुल प्रभू, गिरीश प्रभू, सौरभ घोगळे, सुहास घोगळे, बाळा मोहिते यांनी कंबरे पर्यंत पाण्यात जाऊन जाड दोराच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले. ८ फुट उंचीवर झाडावर हा तरुण सुमारे ३ ते ४ तास अडकून होता. खाली कंबरे एवढे पाणी व पाण्याचा शेतातून नदीच्या दिशेने जाणारा झोत होता. अशा स्थितीत या तरुणाला सुखरूप बाहेर काढणाऱ्या ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .









