बाणस्तारी मार्केट प्रकल्पाचे काम पुर्ण, ऑगस्ट महिन्यात लोकार्पण
माशेल : ब़ाणस्तारी येथील नवीन मार्केट प्रकल्पाचे काम पुर्ण झाले आहे. सुमारे 19 कोटी 50 लाख रूपये खर्चुन मार्केट प्रकल्प सज्ज असून येत्या चतुर्थीपुर्वी लोकार्पण करण्यात येईल असे संकेत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिले. बाणस्तारी मार्केट प्रकल्पाची पाहणी काल सोमवारी मंत्री गावडे यांनी केली. पारंपारिक चतुर्थीचा माटोळी बाजार म्हणून सर्वत्र राज्यभर प्रसिद्ध असलेल्या बाजारासाठी नवीन सुसज्ज वास्तू उभी राहत असल्यामुळे आपल्या जाहीरनाम्याची पुर्तता झाल्याचे समाधानही त्यानी व्यक्त केले. आपल्या पुर्ण देखरेखेखाली अंत्यत उत्कृष्ट दर्जाचे काम झालेले असल्याचे त्यानी सांगितले. कुठल्याही त्रुटी राहू नये दक्षता बाळगलेली आहे. प्रकल्पाच्या आतील भागात स्थानिकांचे श्रद्धास्थान आहे, त्या देवस्थानासाठी कार्यालय तसेच पेव्हर्सचे बसविण्याच्या कामास विलंब झाल्यामूळे प्रकल्पाचे लोकार्पण काही वेळासाठी पुढे ढकलेले आहे. येत्या आठ दिवसात हे काम पुर्णत्वास आणून रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात येणार आहे. चतुर्थीच्या माटोळी बाजारापुर्वी कुठल्याही परिस्थितीत या प्रकल्पाचे लोकार्पण होईल अशी ग्वाही मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. गेली दोन तीन वर्षे चतुर्थीच्जा बाजार मारूती मंदिराजवळील अडचणींच्या जागेत भरविण्यात येत आहे. ती जागा अपुरी पडत असल्याच्या व्यापाऱ्याच्या तक्रारी आजही कायम आहेत. तरीही व्यापारी व ग्राहकांनी कळ सोसली याबाबत व्यापाऱ्याचे आभार व्यक्त केले आहे. यंदाचा चतुर्थीचा पारंपारिक माटोळी बाजार नवीन मार्केट संकुलात भरविला जाईल याबाबत निश्चित राहण्याचे सांगितले.
विधानसभा अधिवेशनानंतर बाणस्तारी मार्केटचे लोकार्पण
विधानसभा पावसाळी अधिवेशनाची सांगता झाल्यानंर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी बाजार प्रकल्पासाठी आवश्यक बाबीची ना हरकत दाखले व इतर सोपस्कर पुर्ण करण्यात येईल. त्यानंतर प्रकल्पातील दुकानांची पावणी, सफाई कामगारांची नेमणूक यासंबंधी निर्णय घेण्यात येईल. प्रियोळ मतदारसंघाचा सर्वागिण विकास करताना मागील महिन्याभरापुर्वी म्हार्दोळ येथे नवीन पोलीस स्थानक उभारून येथील स्थानिकांची सोय करण्यात आलेली आहे. त्यानंतर फोंडा तालुक्यातील बाणस्तारी हा सुसज्ज मार्केट प्रकल्प ठरणार आहे. भविष्यात बेतकी येथील आरोग्य केद्राचे रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी आपले प्रयत्न राहील असे ते म्हणाले.









