प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी येथे सार्वजनिक ठिकाणी मटका घेणाऱ्या एका युवकाला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी दुपारी ही कारवाई केली असून, त्याच्याजवळून 1100 रुपये रोख रक्कम, मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. यासंबंधी दोघा जणांवर एफआयआर दाखल केला आहे.
नागराज यल्लाप्पा तल्लूर (वय 45) राहणार सिद्धेश्वर गल्ली, कणबर्गी असे त्याचे नाव आहे. कणबर्गी येथील सेंच्युरियन क्लबजवळ मटका घेताना पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार, श्रीशैल हुळगेरी, उदय पाटील आदींनी ही कारवाई केली आहे. त्याने आपण चिठ्ठ्या भैरगौडा जोतिबा पाटील यांना पोहोचवत असल्याची कबुली दिली असून त्यामुळे दोघा जणांवर एफआयआर दाखल केला आहे.









