प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वोदय मार्ग, हिंदवाडी येथे मटका घेणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. शनिवार दि. 4 नोव्हेंबर रोजी सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हिंदवाडी येथे मटका घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून अमित प्रमोद धामणेकर, रा. कपिलेश्वर कॉलनी याला अटक केली आहे. त्याच्याजवळून 4350 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. कर्नाटक पोलीस कायदा 78(3) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









