वृत्तसंस्था/ मथुरा
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी मथुरेच्या शाही इदगाह ट्रस्ट आणि उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाची याचिका माघारी पाठवली आहे. न्यायमूर्ती प्रकाश पडिया यांच्या न्यायालयाने सोमवारी मथुरेच्या जिल्हा न्यायाधीशांना संपूर्ण प्रकरणाची नव्याने सुनावणी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणावरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 17 एप्रिल रोजी निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर 24 एप्रिल रोजी निर्णय येणार होता, मात्र त्या दिवशीही पुढील तारीख बदलून 1 मे करण्यात आली होती.









