नवी दिल्ली : 2023 च्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या लंकन संघामध्ये अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज व डी चमीरा हे शुक्रवारी येथे राखीव खेळाडू म्हणून लखनौमध्ये दाखल होत आहेत. मॅथ्यूज व चमीरा यांनी शेवटचा वनडे सामना गेल्या जूनमध्ये अफगाण संघाविरुद्ध खेळला होता. 36 वर्षीय मॅथ्यूजने 221 वनडे सामन्यात फलंदाजीत जवळपास 6 हजार धावा आणि गोलंदाजीत 120 गडी बाद केले आहेत. 31 वर्षीय चमीराने 44 वनडे सामन्यात 50 गडी बाद केले आहेत. मॅथ्यूज आणि चमीरा हे भारतात राखीव खेळाडू म्हणून लंकन संघात दाखत होत आहेत. लंकेचा या स्पर्धेतील पुढील सामना नेदरलँडस् बरोबर 21 ऑक्टोबरला लखनौमध्ये खेळविला जाणार आहे.
Previous Articleएचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकडे दुर्लक्ष
Next Article फलंदाजी मानांकनात रोहित शर्मा सहाव्या स्थानी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









