चीनच्या जियांशी येथील घटना
वृत्तसंस्था/ जियांशी
चीनच्या जियांशीमध्ये अनेक लोकांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 3 जणांना जीव गमवावा लागला असून 6 हून अधिक जण जखमी झाले आहेत. चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जियांगशीच्या किंटरगार्डनमध्ये चाकू हल्ल्याची घटना घडली असून पोलिसांनी याचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी सोशल मीडिया ऍप वीबोवर याची माहिती दिली आहे. संशयित आरोपीने टोपी परिधान केली होती तसेच चेहऱयावर मास्क घातला होता. संशयित सुमारे 48 वर्षांचा असावा असे म्हणत पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. बंदुकीसंबंधी कठोर नियम आणि चोख सुरक्षेमुळे चीनमध्ये हिंसक गुन्हय़ांचे प्रमाण तुलनेत कमी आहे. परंतु मागील काही वर्षांमध्ये चाकू आणि धारदार शस्त्रांद्वारे हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.









