नृसिंहवाडी/प्रतिनिधी
मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आज पाहटे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे जाऊन दत्त दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही सोबत होता. या दोघांनी पहाटे काकड आरतीला हजेरी लावून दत्त दर्शन घेतले. तसेच अर्जुनला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळावे श्री दत्त चरणी प्रार्थना केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सोमवारी पहाटे 4:45 वाजता सचिन तेंडुलकर व अर्जुन तेंडुलकर पिता-पुत्र यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या व श्री दत्त दत्त महाराजांची राजधानी असलेल्या दत्त मंदिरास दर्शनासाठी भेट दिली व दत्त चरणाचे रांगेतून दर्शन घेतले. दरम्यान, त्यांचा मुलगा अर्जुन याची गोव्यामध्ये असलेल्या क्रिकेटसाठी दत्ताचे आशीर्वाद मिळावेत तसेच भारतीय संघात निवड व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी सौरभ भोळे उपस्थित होते. तर नवल खोंबारे यांनी श्री दत्त चरणी प्रार्थना करून श्रीफळ प्रसाद दिला.